सदगुरु शंकर महाराज जयंतीनिमित्त कोळेवाडी येथे हरीनाम सप्ताहस

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 09/05/2024 8:26 AM



दहिवडी प्रतिनिधी
(विजय जगदाळे)
दहिवडी:लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले समर्थ सदगुरु शंकर महाराज रसाळ यांची जयंती मोठ्या उत्साहात श्री क्षेञ कोळेवाडी ता.माण येथे संपन्न होत आहे त्या निमित्ताने इंचगिरी रसाळ सांप्रदयाच्या वतीने मठाधिपती समर्थ सदगुरु पांडुरंग महाराज रसाळ यांच्या मार्गदर्शना खाली गुरुवार दिनांक ९-५-२०२४ ते १३-५-२०२४ रोजी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.
गुरुवार दिनांक ९ मे रोजी हभप संदिप महाराज कोळेकर शुक्रवार १० मे रोजी   स्वामी शिवानंद अध्यात्मिक केंद्र बेळगांवचे मठाधिपती हभप भाऊसाहेब महाराज पाटील  शनिवारी ११ मे रोजी हभप श्रीपाद महाराज जाधव सातारा रविवारी १२ मे रोजी हभप दिनेश महाराज रसाळ यांचे किर्तन होणार आहे १३ मे रोजी सकाळी १० ते १२  रोजी काल्याचे व शुध्द षष्टीचे फुलाचे किर्तन मठाधिपती पांडुरंग महाराज रसाळ यांचे होणार आहे.किर्तन रोज सायंकाळी ९ ते ११ तर प्रवचन रोजसायंकाळी  ५ ते ६  असे हौणार आहे या मध्ये आकाश महाराज जगदाळे ,कृष्ण महाराज वर्तक,सावता महाराज शिंदे ,युवराज महाराज पवार यांचे प्रवचन होणार आहे.
शुक्रवारी दिनांक १० -५-२०२४ रोजी सकाळी ९ ते ११ जयंती निमित्त पुष्पवृष्टीचे किर्तन सांप्रदयाचे आध्यक्ष हभप तुकाराम रसाळ यांचे  आहे  शनिवारी आनुग्रहाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी दिनांक १२-५-२०२४ सकाळी समर्थ गुरुदेव दादांच्या प्रतिमेची नाथाच्या काठीची व शंभु महादेव कावडीची मिरवणूक व दिंडी सोहळा होणार आहे .तरी सर्व इंचगिरी रसाळ सांप्रदायच्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा.


श्री स स शंकर महाराज रसाळ 
श्री स स पांडुरंग महाराज रसाळ

Share

Other News

ताज्या बातम्या