कोल्हापुरी जनतेच्या सहकार्यामुळं श्रीमंत शाहू महाराज हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 05/05/2024 8:40 PM

कोल्हापुरी जनतेच्या सहकार्यामुळं श्रीमंत शाहू महाराज हे ५ लाखांच्या मताधिक्यानं विजयी होतील, यामुळं  खासदार संजय मंडलिक, खासदार महाडिक, हे दोन खासदार आणि एक मंत्री हसन मुश्रीफ या तीन एमचा पराभव होणार, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. आज कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांची भुमी असणारा हा महाराष्ट्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेची पायरी उखडून टाकेल, तसंच  इंडिया आघाडी - महाविकास आघाडी महाराष्ट्रात ३८ जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share

Other News

ताज्या बातम्या