निवडणूक मतदानासाठी माण प्रशासन सज्ज.... ७ मे रोजी होणार सर्व ठिकाणी मतदान: उज्वला गाडेकर

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 05/05/2024 8:36 PM

 

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

43 माढा सर्वत्रिक लोकसभा मतदार संघासाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार असून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ यामध्ये सातारा जिल्ह्यातील मान,खटाव,फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला माळशिरस माढा आणि करमाळा मतदारसंघ असून माण तालुका प्रशासनाच्या वतीने या निवडणूक मतदानासाठी तयारी करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, माण तथा  प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी दिली. 
   
मतदानासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आवश्यक असलेली सेवा सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय वाढते तापमान विचारात घेऊन मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंडप जिथे आवश्यक आहे तिथे महिला मतदार व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी बसण्याची प्रतीक्षा कक्ष ओआरसचे पाकीट यासह फिरते वैद्यकीय पथक इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 


माण तालुक्यातील आकडेवारी.. 
एकूण मतदार : ३ लाख ५० हजार ११ 
पुरुष मतदार : १ लाख ८० हजार २७ 
महिला मतदार : १ लाख ६९ हजार ९७५ 
इतर मतदार : ९ 
मतदान केंद्र : ३६९
आदर्श मतदान केंद्र : ३ थीम (जयजवान म्हसवड, जयकिसान तडवळे, हुतात्मा वडूज) 
महिला चालविणारे मतदान केंद्र : २
युवा मतदान केंद्र २ 
दिव्यांग मतदान केंद्र १
निवडणुकीसाठी कर्मचारी : १५०० साधारणता: 
पोलीस कर्मचारी : ७०० साधारणता:

Share

Other News

ताज्या बातम्या