*स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅली*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 05/05/2024 9:33 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

*जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी*

*बाईक रॅलीत 700 हून अधिक वाहनांचा समावेश*

सातारा दि. :  सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा स्वीप कक्षा मार्फत जिल्ह्यात सर्व ठिकाणी सायंकाळी चार ते सहा या वेळामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 
सातारा जिल्हा मुख्यालयातील बाईक रॅली सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानातून सुरू झाली.  यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, सातारा, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा परिषद प्रकल्प संचालक  संतोष हराळे यांच्यासह प्रशासकीय प्रमुख अधिकारी बाईकवरुन सहभागी झाले होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन निलेश घुले, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमळे,   पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी  क्रांती बोराटे,  शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मूजावर,  शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्रभावती कोळेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,महिला व बालकल्याण रोहिणी ढवळे, गटविकास अधिकारी पंचायत समिती सतीश बुद्धे, तसेच सातारा जिल्हा परिषद सर्व कर्मचारी पंचायत समिती सर्व कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक उपस्थित होते.
सदर रॅली सातारा जिल्हा परिषद मैदानातून पोवई  नाका मार्गे मोळाचा वाडा ,वर्ये,  नेले, किडगाव, कळंबे, माळ्याची वाडी, साबळेवाडी कोंडवे मार्गे सातारा परत आली. रॅलीच्या वेळी 100% सातारा, 7 मे ला मतदान करा अशा पद्धतीचे फलक हातामध्ये घेण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये ई-बाईक चा वापर करण्यात आला. तसेच हेल्मेटचा वापर करण्यात आला .रॅलीच्या सुरुवातीला मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. रॅलीमध्ये 700 ते 800 दुचाकी वाहनांचा समावेश होता अतिशय शिस्तबद्ध रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच मतदान जनजागृतीचा एक अभिनव उपक्रम म्हणून सदर रॅली आयोजित केली गेली.

Share

Other News

ताज्या बातम्या