लातूर शहरात घरफोडी; दहा लाखांचा ऐवज लंपास

  • रिजवान मकानदार (Latur)
  • Upadted: 31/07/2020 9:29 PM

लॉकडाऊनमुळे घर बंद करुन मुळ गावी गेलेल्या प्राध्यापकाचे घर फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुणगुणे नगर येथील व्यंकटेश अपार्टमेंट मधील २०१ नंबरच्या सदनिकेत, प्रसाद गोविंद जामखंडे (वय ३४) हे वास्तव्यास आहेत. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यामुळे जामखंडे हे घराला कुलूप लावून ते उदगीर येथे मुळ गावी गेले होते.

 घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात आरोपिंनी दुपारी १ ते रात्री ८ वाजेच्या सुमारास घराचा कडी कोंडा तोडून  तीन लाख रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने असा साधारण १० लाख ५७ हजार ८९० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. 

दुसऱ्या दिवशी जामखंडे हे घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी प्रसाद जामखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांत गुरनं २४४/२० कलम ४५४, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या