मिरज रेल्वे जंक्शनला बजेटमध्ये म्हणावी तशी तरतुद नाही : किशोर भोरावत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/02/2023 7:02 PM


 
     मिरज जंक्शनला भरीव अशी तरतुद होणे गरजेची होती.तशी झालेली नाही.मध्य रेल्वे पुणे विभागाचे पुणे नंतर उत्पन्न मिळवुन देणारे मिरज हे दुसरे स्थानक आहे.मिरज जंक्शनचे रिडेव्हलेपमेंट मंजुर झालेले आहे त्याने स्टेशन व प्लँटफाँर्म चे शुशोभीकरन होइल मात्र पुणे मिरज लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण व विघृतीकरण पुर्णत्वाकडे जात आहे पण हे दुहेरीकरण मिरज यार्ड प्रयंतच होइल व पुढील भाग जशास तसे वापरला जाईल.परंतु मिरज जंक्शन मधील सर्व प्लँटफाँर्मची  लांबी,रुंदी व उंची वाढवणे,पिटलाईन चे रखडलेले काम सुरु करणे,मिरज मध्ये गाडी पार्किंगची लाईन टाकणे व विजयनगर मिरज व आरग मिरज लाईन थेट मिरज लाईनला जोडणे या कामाकरीता या बजेट मध्ये निधी उपलब्ध करणे गरजेचे होते तसे झाले नाही.यासाठी रेल्वेच्या अधिकारीशीं अनेक वेळा ह्या बाबी लक्षात आणुन दिल्या होत्या.आता लोकप्रतीनिधींनीही लक्ष देणे गरजेचे आहे.

किशोर भोरावत 
DRUCC MEMBER PUNE DIVISION

Share

Other News

ताज्या बातम्या