ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*गडचिरोली जिल्ह्यात आज 07 कोरोना बाधित तर 03 कोरोनामुक्त*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 6/26/2022 10:51:03 PM

गडचिरोली, दि.26: आज गडचिरोली जिल्हयात 570 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 07 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37518 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36707 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 38 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.84 टक्के,सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.10 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे. 
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 01, तर कुरखेडा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे. 
*****

Share

Other News