कॅम्पस इंटरव्ह्यू अंतर्गत भगूरच्या 9 विद्यार्थ्यांची
HDFC बँकेत निवड.
शिक्षण मंडळ भगूर संचलित,
शिक्षण मंडळ भगूर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील 9 विद्यार्थ्यांची एचडीएफसी बँकेत विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.
व्यवसाय व रोजगार मार्गदर्शन समिती (Placement Cell ) अंतर्गत कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. त्यात HDFC बँक तर्फे श्री स्वप्नील अहिरे (Asst. Branch Manager) श्री मिलिंद गणोरे ( Deputy Manager ) हे मुलाखत घेण्यासाठी उपस्थित होते. त्यामध्ये महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी 9 विद्यार्थ्यांचे HDFC बँकेच्या विविध पदांवर निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री एकनाथराव शेटे,महाविद्यालयाचे समन्वयक श्री जितेंद्रजी भावसार,महाविद्यालयाचे प्राचार्य श्री समीर महाले,व्यवसाय व रोजगार मार्गदर्शन समिती प्रमुख श्रीमती प्रा.राणी झनकर व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.