प्रकरण कोडवानी रूग्णालयाचे
आमदार राजु कारेमोरे यांची उपोषन मंडपाला भेट
रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना डॉ. कोडवाणी कोविड केअर सेंटर खासगी रुग्णालयाने शासनाचे नियम पायदळी तुडवून रुग्णांची लुबाडणूक केली अशी तक्रार स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत.
डॉ. गोविंद कोडवणी यांनी स्वतः रुग्णालयात एका खाजगी न्यूज पोर्टल ला माहिती देतांनी सांगितले की, कोरोना संसर्गजन्य काळात आमच्या रुग्णालयाकडून आठ हजार रुग्णांवर उपचार करून सदर रुग्णांना रिकवर अर्थातच दुरुस्ती केल्याचे सांगितले आहे, एकूणच रुग्णालयाकडून याबाबत जनतेची दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
कोविड रुग्णांच्या वाढिव बिलासंदर्भात मागील काही दिवसांपासून शिवसेनेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. ही लुबाडणूक तात्काळ थांबविण्यात यावी. सदर प्रकरणी रुग्णालयाची चौकशी करण्यात यावी यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांना पत्र सादर केले होते. परंतु, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या तक्रारीबाबत कुठल्याही प्रकारची कार्यवाही अद्यापही केली नसल्यामुळे शिवसेनेने नियोजन धरणे आंदोलन ९ जून बुधवारपासून सुरू केले आहे. नियमाची पायमल्ली करून जनतेची होणारी लुबाडणूक रोखण्याच्या संदर्भाने शिवसेनेचे आंदोलन सुरू केले आहे.
सदर आंदोलनाचा दुसऱ्या दिवशी तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांनी आंदोलनास्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला तसेच सामाजिक संस्था लॉयन्स क्लबचे अध्यक्ष मनोज उकरे यांनी सुध्दा पत्र लिहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. जोपर्यंत डॉ. कोडवाणी यांच्यावर जिल्हा प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होत नाही तथा मृत्यू पावलेल्या अन्याग्रस्त कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत शिवसेनेचे धरणे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहिती शिवसेनेने दिली आहे. यावेळी शिवसेनेचे अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, उपतालुका प्रमुख संतोष पाठक शाखा प्रमुख निखील कटारे, तुषार लांजेवार, अरुण डांगरे, प्रवीण गुप्ता, सुनील श्रावनकर उपस्थित होते.