सरसकट दुष्काळ जाहीर ; मनसेच्या मागणीला यश

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 26/09/2026 12:28 PM

खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पावसातील खंड आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे, पीक विम्याची कार्यवाही, नुकसानभरपाई तसेच शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत संबंधित प्रशासनाने सरसकट दुष्काळ अशी घोषणा केली शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात राहील. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील.”
मनसेच्या मागणीला प्रशासनाकडून मिळालेल्या प्रतिसादाचे शेतकरी आणि मनसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, तुळजापूर तालुकाअध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, सोमेश्वर आलुरे, समीर शेख व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना धाराशिव जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या