आवाहन

नाशिक जिल्ह्यातील समाजसेवकांकडून *पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 18/10/2025 9:50 PM

नेहमीच सहकार्याची भावना जोपासून सक्रीय योगदान देणाऱ्या समाजसेवकांनी ठेवला समाजासमोर मोलाचा आदर्श... 
सर्वच क्षेत्रामध्ये चौफेर योगदान देत, परिपूर्ण संघटन म्हणून कार्यक्षेत्र निर्माण करण्यात नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांच्या नेतृत्वात प्राप्त केले यश... तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहराध्यक्ष अविनाशभाऊ वाघ, प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, उ. महाराष्ट्र नेत्या ज्योतीताई काजळे, नाशिक शहर उपाध्यक्ष सुवर्णाताई उदावंत, मारवाडी युवा मंच नाशिक अध्यक्ष रोशनीताई राठी, प्रांत अध्यक्ष अमृताताई भुतडा, कांचनताई भुतडा यांच्या सक्रीय सहभागाने ठेवला समाजासमोर आदर्श  ...
पूरग्रस्त भागांमध्ये जनतेला दिवाळीसाठी सामग्री पोहोचवण्यास नाशिक मधून समाजसेवकांचा ताफा पूरग्रस्त ठिकाणी रवाना करण्यात आला, यामध्ये समाजसेवक अनिलभाऊ मोरे, जनसेवक अरुणनाना पगारे, दावीद भाऊ सुतार, समाधानभाऊ पगारे, युवा नेते राहुलभाऊ मोरे, दिलीपभाऊ साठे, सागरभाऊ सोनकांबळे, सुरेशभाऊ सातव, राहुल जमदाडे, जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब सोनवणे, शेतकी सोसायटी उपाध्यक्ष बाळासाहेब साळवे यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मदत पोहोचवण्यासाठी सक्रिय नियोजन केले, यामध्ये राजूभाऊ शिरसाट, दुष्यंतजी वाघ, तुकारामजी हांडगे, देविदासजी आंबीलकर, श्यामभाऊ डावरे, सुभाष ठुबे, गोरख बोऱ्हाडे यांच्यासहित वेगवेगळे ठिकाणी तेथील स्थानिक समाजसेवकांनी उत्तम सहकार्य केलेले आहे, तसेच धडाडीने समाजकार्य करणाऱ्या करणाऱ्या या टिमने नाशिक महानगर पालिकेचा निकृष्ट कारभार देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला आणि यासंबंधी सर्व कागदपत्रांचा आधार घेऊन उघडकीस आणला नाशिक रोड प्रभागातील भ्रष्टाचार..
          1) मागील काही महिन्यांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे व आलेल्या पूरस्थितीमुळे अनेक गोरगरीब नागरीक अडचणीत आहेत. दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत मदत करण्यासाठी आम्ही शिवक्रांती सेना व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सहकार्याने धान्य राशन, जुने कपडे, भांडे, चप्पल, खाद्यपदार्थ, तसेच काही पॅक केलेल्या वस्तू अशा जमा केलेल्या आहेत, ही संपूर्ण सामग्री एकत्रित करून आम्ही पूरग्रस्त भागात दीपावली दरम्यान पोहोचवण्यासाठी नियोजन केले आहे. सामग्री घेऊन जाताना आमच्या गाड्यांना कुठलाही टोल लागू नये, ट्राफिक पोलिसांकडून व त्या त्या ठिकाणचे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळावे ही मागणी केली व जिल्हा प्रशासनाने ती मागणी मान्य करीत तसे पत्र देखील दिले. या सर्व साहित्यासह अविनाशभाऊ वाघ यांच्या नेतृत्वात समाजसेवक सदर ठिकाणी वस्तू वाटप करून येत आहेत.
          2) प्रभाग क्रमांक 19 मध्ये विकासाच्या नावाखाली महानगरपालिका व प्रस्तावित असलेल्या भागात 2019 मध्ये प्रभाग क्रमांक 19 गोरेवाडी येथे सुलभ सौचालयाचे काम हे झालेले असून, यामध्ये पुरुष व स्त्रिया याकरिता शौचालय बांधकाम झालेले असून, या कामाकरिता महानगरपालिकेने प्रस्तावित बांधकामावरती सुमारे 48 लाख 48 हजार 628 रुपये इतका खर्च दाखवलेला असून, या कामाचा खरोखरच इतका खर्च आहे का हे पडताळले असल्यास, आपणास मोठ्या प्रमाणात जनतेचे व महानगरपालिकेतील निधीचा गैरवापर झालेला दिसून येईल, कृपया आपण या संबंधात चौकशी लावावी अशी विनंती उपस्थितांकडून केली गेली.
या सर्व उपक्रमाचे सर्वच माध्यमातून कौतुक केले जात आहे व थोरामोठ्यांकडून आशिर्वाद रुपी अभिनंदन सुद्धा केले जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या