कुपवाड येथे भगवान महावीर निर्वाण महा महोत्सव निमित्त मंगळवार दिनांक 21 रोजी 24 तीर्थंकर यांचे भव्य स्वरूपात अभिषेक व शांतीधारा श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (लाल बस्ती) येथे होणार आहे.
कुपवाड येथे प्रथमच भगवान महावीर यांचे 2551 वे निर्वाण महा महोत्सव निमित्त या भव्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठाचार्य दीपक उपाध्ये, वर्धमान उपाध्ये व संगीतकार सौ रोहिणी पाटील यांच्या सानिध्यात पहाटे पाच पासून मांगलिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये पहाटे 5 वाजता मंगलवाद्य घोष होणार आहे त्यानंतर ध्वजारोहण, प्रमुख श्रावक- श्रविकांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन संगीतमय मंगलाष्टकासह नित्य पूजेस प्रारंभ होईल. व नवदेवता, भगवान पार्श्वनाथ पूजन, भगवान महावीर यांची अष्टद्रव्याने भव्य पूजन, पंचकल्याण पूजन, निर्वाण महोत्सव पूजन व निर्वाण लाडू चढवणे चा विधी पार पडणार आहे. तदनंतर 24 तीर्थंकर यांचे भव्य अभिषेक व शांतीधारा विधी संपन्न होणार आहे. मंगल आरतीने महावीर निर्वाण महामहोत्सवाची सांगता होणार आहे.कुपवाड मधील लाल जिन मंदिराच्या प्रांगणात पार पडणाऱ्या महामहोत्सवाचा लाभ कुपवाड पंचक्रोशीतील श्रावक-श्राविक व नागरिकांनी घ्यावे.असे आवाहन मंदिर कमिटीचे अध्यक्ष नेमिनाथ बोरगावे.उपाध्यक्ष सचिन नरदेकर.सचिव कुमार लोकपूरे,खजिनदार रायगोंडा पाटील व संचालक अमोल पाटील यांनी केले आहे.