श्री शारदा भवन शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/09/2026 2:48 PM

अर्धापूर :-श्री शारदा भवन प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा, अर्धापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अरुण कल्याणकर होते. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमाकांत धसवाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
    यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.एस.जी. हुस्सेकर मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. अनिल सवडतकर, ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.एस. खांडरे, ज्येष्ठ शिक्षक श्री. गुलाबराव मदने यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमात सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. प्रकाश कदम यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, संघर्ष आणि हुतात्म्यांचे योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. रमाकांत धसवाडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासाची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे आवाहन केले.
    अध्यक्षीय समारोपात हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अरुण कल्याणकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक तथा क्रीडा विभाग प्रमुख श्री. गुलाबराव मदने यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. आत्माराम कदम यांनी मानले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
   या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  एस. एस. डोईबळे, आर. एम. खडकीकर, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, ए. ए. राऊतवाड,माधव माधवी, आय. एस. शेख, वाय. जी. टिप्परसे,बी.जी.आवरे, एस.एम.दापकेकर,आर. जी. पाटील, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडीत, व्ही. डी. काळे, एन. पी. केरूरकर, पी. डब्ल्यू. लोखंडे आणि व्ही. के. कवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या