गणेशोस्तवाच्या पाश्वभूमीवर टिळक चौक ते पटेल चौक प्रमुख मार्गाची व्यापक पाहणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/09/2026 9:29 PM

गणेशमूर्ती मिरवणुका सुरक्षित व सुरळीत पार पडण्यासाठी महापालिका प्रशासनाची पूर्वतयारी

सांगली, दि. १५ सप्टेंबर २०२६ :
आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील गणेशमूर्ती मिरवणुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या टिळक चौक ते पटेल चौक या संपूर्ण मार्गाची आज सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने व्यापक स्वरूपात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

सांगली शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो. सांगली गणपती पंचायतन तसेच विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या मिरवणुकीचे प्रस्थान या प्रमुख मार्गावरून होत असल्याने गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविक, गणेशभक्त व नागरिकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मिरवणुका सुरक्षित, सुरळीत व अडथळेमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे.

महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार व्यापक पाहणी

महापौर धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गणेशोत्सवापूर्वी सदर प्रमुख मार्गाची संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज ही व्यापक पाहणी करण्यात आली.

या पाहणीमध्ये अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख, तांत्रिक अधिकारी व कर्मचारी, अभियंते तसेच MSEDCLचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

🔎 मिरवणूक मार्गावरील विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी

पाहणीदरम्यान टिळक चौक ते पटेल चौक या संपूर्ण प्रमुख मार्गावरील गणेशमूर्ती मिरवणुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने—

* रस्त्यावरील खड्डे व रस्त्याची स्थिती
* रस्त्यालगतची अतिक्रमणे व अडथळे
* विद्युत व दूरसंचारच्या लोंबकळणाऱ्या तारा
* धोकादायक स्थितीतील विद्युत पोल
* स्ट्रीट लाईट व्यवस्था
* मिरवणुकीस अडथळा ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या
* नाले व गटारी
* रस्त्यावरील अन्य अडथळे
* तसेच गणेशमूर्तींच्या मिरवणुकीच्या सुरक्षित व सुरळीत वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकणाऱ्या इतर बाबी

यांची पाहणी करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या