सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सर्वसामान्य, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना परवडणारी, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा मिळावी या उदात्त उद्देशाने स्व. मदनभाऊ पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. हे हॉस्पिटल जनतेच्या कराच्या पैशातून उभे राहिले असून, त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला समानपणे मिळणे हा मूलभूत हेतू आहे.
मात्र, महापालिकेच्या महासभेत हे हॉस्पिटल PPP (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर खासगी संस्थेकडे देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला नगरसेविका प्राजक्ता सनी धोतरे यांनी ठाम आणि स्पष्ट विरोध दर्शवत, "हे हॉस्पिटल महापालिकेनेच चालवावे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायम खुले ठेवावे," अशी जनहिताची भूमिका मांडली.
आरोग्य ही नागरिकांची मूलभूत गरज आहे, ती नफ्याचे साधन बनू नये. त्यामुळे स्व. मदनभाऊ पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण न करता महापालिकेनेच सुरू करून प्रभावीपणे चालवावे, हीच सांगली, मिरज आणि कुपवाड येथील सर्वसामान्य नागरिकांची प्रामाणिक अपेक्षा आहे.
"जनतेच्या पैशातून उभारलेले हॉस्पिटल जनतेसाठीच राहिले पाहिजे — खासगीकरणासाठी नाही!"