नांदेड :- आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, मुंबई तसेच जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दि. 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत राज्यव्यापी रक्तदान व महाआरोग्य शिबिर अभियान आयोजित करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमध्ये विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) पुढीलप्रमाणे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
* रक्तदान शिबिर : दि. 22 ते 28 जुलै 2026 – रक्तपेढी (ब्लड बँक)
* स्तन कर्करोग तपासणी शिबिर : दि. 22 ते 24 जुलै 2026 – ओपीडी क्र. 123
* गर्भाशयमुख (Cervical) कर्करोग तपासणी शिबिर : दि. 25 ते 27 जुलै 2026 – ओपीडी क्र. 118
* बोन मिनरल डेन्सिटी (BMD) व हाडांची तपासणी शिबिर : दि. 22 ते 24 जुलै 2026 – ओपीडी क्र. 115
* नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर : dि. 22 ते 25 जुलै 2026 – ओपीडी क्र. 121
या महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध आरोग्य तपासणी व उपचार सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.