अन्यायी घरपट्टी वाढीविरोधात उद्यापासून कुपवाड संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/07/2026 1:40 PM

अन्यायी घरपट्टी वाढीविरोधात उद्या पासून कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने ‘बेमुदत आमरण उपोषण’ करण्यात येणार आहे.

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायी व अवाजवी घरपट्टी वाढीविरोधात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती, कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती कुपवाड, विविध राजकीय पक्ष, राजकीय नेते, सामाजिक संघटना तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने संघर्ष करत आहेत.

या अन्यायी घरपट्टी वाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती कुपवाडच्या वतीने दि. २२ जुलै २०२६ रोजी पासून बेमुद्दत 'आमरण उपोषण’ आयोजित करण्यात आले आहे.

महानगरपालिकेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांचा आवाज पोहोचवण्यासाठी या आंदोलनात प्रत्येक नागरिकाची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोणताही पक्षभेद न ठेवता मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आमरण उपोषण करतेस बळ द्यावे, अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात आली.

📍 स्थळ : सोसायटी चौक, मेन रोड कुपवाड
दिनांक : २२ जुलै २०२६ बुधवार पासून
🕥 वेळ : सकाळी १० वाजता

कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती कुपवाड

Share

Other News

ताज्या बातम्या