मुख्यमंत्री जन आरोग्य शिबीरा अंतर्गत मनपाच्यावतीने उद्या भव्य 'महिला आरोग्य तपासणी शिबीर'; महापौरांचा विशेष पुढाकार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/07/2026 7:13 PM

नांदेड : मुख्यमंत्री जन आरोग्य अभियाना अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आणि *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या विशेष पुढाकारातून शहरातील महिलांसाठी बुधवार दि.२२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून एका भव्य 'महिला आरोग्य तपासणी शिबीराचे' आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या *मातृसेवा केंद्र शिवाजी नगर* येथे हे शिबीर पार पडणार आहे.

महिलांचे आरोग्य हा कुटुंबाचा आणि समाजाचा पाया आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हीच बाब लक्षात घेऊन महापौरांच्या संकल्पनेतून आणि *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शहरातील सर्व स्तरांतील विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी या विशेष तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरामध्ये स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजीशियन आणि इतर तज्ञ महिला वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील. ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन आणि इतर आवश्यक प्राथमिक चाचण्या मोफत केल्या जातील. त्याचप्रमाणे महिलांमध्ये वाढत्या गर्भाशयाच्या आणि स्तनांच्या कर्करोगाच्या निदानासाठी विशेष स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध असेल.तपासणीनंतर रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती औषधे मोफत दिली जातील. या शिबीराची सुरुवात उद्या सकाळी महापौर सौ.कविता संतोष मुळे, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील आणि इतर लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

*महापौरांचे आवाहन :*
"शहरातील प्रत्येक भगिनीने आपल्या आरोग्याला प्राधान्य देऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने या शिबीरात सहभागी व्हावे," असे आवाहन नांदेड महानगरपालिकेच्या वतीने महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या