ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी २८ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/07/2026 8:36 PM

नांदेड : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागात उद्योग उभारून रोजगारनिर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार- २०२६’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शासकीय योजनांच्या माध्यमातून उद्योग उभारणी करून यशस्वी ठरलेल्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार तसेच काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

राज्यातील यशस्वी ग्रामोद्योग उद्योजकांना सन्मानित करून इतरांना उद्योग क्षेत्रात प्रेरणा मिळावी, तसेच रोजगारनिर्मितीला चालना मिळावी हा या पुरस्काराचा उद्देश आहे. सन २०२३ पासून ही योजना राज्यस्तरावर राबविण्यात येत आहे.

इच्छुक उद्योजकांनी नामांकन अर्ज www.mskvib.org या संकेतस्थळावरून डाउनलोड करावेत किंवा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयातून प्राप्त करावेत. भरलेले अर्ज दि. २८ जुलै २०२६ पर्यंत संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२४०६७४ वर संपर्क साधावा.

Share

Other News

ताज्या बातम्या