आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या माऊलींच्या पायी दिंडी मार्गावर त्यांच्या सेवेचा सुवर्णयोग साधण्यात आला. उपमहापौर श्री. गजानन मगदूम व शिवप्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला.
तहानलेल्या वारकऱ्यांसाठी पाण्याची सोय आणि प्रवासात ऊर्जा लाभावी यासाठी लाडू व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. वारकरी संप्रदायाची सेवा करणे आणि पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आपले भाग्य आहे. माऊलींच्या कृपेने सर्वांची वारी सुखकर होवो, हीच सदिच्छा!