आंतरजिल्हा घर फोडी टोळीचा पर्दाफाश;8 घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस₹4,58,500/- चा मुद्देमाल हस्तगत;स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ची कारवाई

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 12/07/2026 4:36 PM

नांदेड:-नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातत्याने गुन्हेगारांचा शोध घेत आहे. त्याच अनुषंगाने पोलीस ठाणे नायगाव व कुंटूर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते.

दिनांक 11 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नायगाव परिसरात झालेल्या घरफोडी / चोरीमधील आरोपींचा शोध घेत असताना नायगाव व कुंटुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजचे विश्लेषण करुन तसेच तांत्रीक व गोपनिय माहितीच्या आधारे मौजे सांगवी टी-पॉईंट, नांदेड येथे दोन संशयित व्यक्ती आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे 1) शंकर उर्फ सोनू पिराजी पवार (वय 25 वर्षे, रा. वडारगल्ली, कारखानारोड, वसमत, जि. हिंगोली) व 2) विधी संघर्षग्रस्त बालक अशी सांगितली.

त्या दोघांना अधिक विश्वासात घेऊन सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रीक व गोपनीय माहितीच्या आधारे कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी नायगाव, कुंटुर, मुदखेड, पालम, पिंपळदरी (जि. परभणी), तालुका (जि. जालना) तसेच मुंबई परिसरात त्यांनी व त्यांच्या साथीदारांसह घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

चौकशीत आरोपी 1) शंकर उर्फ सोनू पिराजी पवार (वय 25 वर्षे, रा. वडारगल्ली, कारखानारोड, वसमत, जि. हिंगोली) व 2) विधी संघर्षग्रस्त बालक यांनी त्यांचे साथीदार 3) राहुल यलप्पा गुंडाळे, 4) लखन रमेश मारखुळे, 5) बाबा बालाजी ऊर्फ बालु पवार, दोघे राहणार वसमत, हिंगोली 6) अमोल शंकर चव्हाण, अंबानगर, सांगवी, नांदेड यांच्यासह नायगाव, कुंटूर व मुदखेड येथील विविध गावांतील किराणा दुकाने, मोबाईल दुकाने, ग्राहक सेवा केंद्रे तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांचे शटर उचकटून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. तसेच नायगाव व जालना येथून दोन मोटारसायकली, तर मुंबई येथून एक बुलेट मोटारसायकल चोरी केल्याचेही उघड झाले. आरोपींनी चोरीच्या मोटारसायकली नांदेड येथील माळटेकडी परिसरातील एका बंद घराजवळ लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पथकाने त्या ठिकाणी जाऊन वाहनांसह इतर मुद्देमाल जप्त केला.

या कारवाई दरम्यान ताब्यातील आरोपींकडून एकूण ₹4,58,500/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला (विविध चोरीच्या गुन्ह्यांतील रोख रक्कम 18,500/-, एक पल्सर व एक अपाची मोटारसायकल (प्रत्येकी कंमत अंदाजे ₹1,20,000/-), एक रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकल (अंदाजे किंमत ₹2,00,000/-) व इतर चोरीतील साहित्य.)

या कारवाईत एकुण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत 1) पो.स्टे. नायगाव गु.र.नं. 153/2026, कलम 305, 331(4), 62 BNS 2) पो.स्टे. नायगाव गु.र.नं. 154/2026, 303(2) BNS, 3) पो.स्टे. कुंटुर गु.र.नं. 164/2026, कलम 305, 331(4) BNS, 4) पो.स्टे. मुदखेड गु.र.नं. 122/2026, कलम 305(अ), 331(4) BNS 5) पो.स्टे. पालम, जि. परभणी गु.र.नं. 273/2026, कलम 334 (4), 305 (अ) BNS 6) पो.स्टे. पिंपळदरी, जि. परभणी गु.र.नं. 126/2026, कलम 305 (अ), 331(1), 3(5) BNS 7) पो.स्टे. तालुका, जालना गु.र.नं. 382/2026, 8) मुंबई येथील मोटार सायकल चोरीचा गुन्हा.

या गुन्ह्यांमध्ये 1) शंकर उर्फ सोनू पिराजी पवार (वय 25 वर्षे, रा. वडारगल्ली, कारखानारोड, वसमत, जि. हिंगोली) व 2) विधी संघर्षग्रस्त बालक यांना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन नायगाव यांच्या तब्यात देण्यात आले आहे. यातील आरोपी 3) राहुल यलप्पा गुंडाळे, 4) लखन रमेश मारखुळे, 5) बाबा बालाजी ऊर्फ बालु पवार, दोघे राहणार वसमत, हिंगोली 6) अमोल शंकर चव्हाण, अंबानगर, सांगवी, नांदेड हे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

तसेच पोलीस ठाणे धर्माबाद, गु.र.नं. 81/2026 कलम 331 (3) (4), 305 BNS मधील पाहिजे असलेला आरोपी शंकर उर्फ सोनू पिराजी पवार, वय 25 वर्ष, राहणार- वडारगल्ली, कारखाना रोड, वसमत, जिल्हा हिंगोली यालाही या कारवाईत ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन नायगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, श्री. सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अतुल भोसले, पोलीस निरीक्षक, श्री. नागनाथ तुकडे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार सपोउपनि/दारासिंग राठोड, पोह/मोहन हाक्के, शिलराज ढवळे, ब्रम्हानंद लामतुरे, पिंगलवाड, लहू चाटे, महेश बडगु सर्व नमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी पार पाडली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या