* माण तालुक्यातील मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ऍक्शन मोडवर*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 31/05/2026 11:55 AM


माण तालुक्यात हातभट्टी दारू अड्ड्यावर म्हसवड पोलिसांची करडी नजर *सहाय्यक पोलीस निरीक्षक ॲक्शन मोडवर*
आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

म्हसवड दी:धुळदेव हद्दीत हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा म्हसवड पोलिसांनी धुळदेव गावच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान घोडेखोर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जुबेरखान दोहेरखान पठाण (रा. पठाणवस्ती, चांदापुरी, ता. माळशिरस) हा धुळदेव परिसरात हात भट्टी दारूची निर्मिती करत असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला.

या कारवाईत दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि रसायन जप्त करण्यात आले. पोलिसांनी २०० लिटर क्षमतेचे चार लोखंडी बॅरल, त्यामधील सुमारे ८०० लिटर रसायन, ७५ लिटर अतिरिक्त रसायन, १८० मिलीच्या बाटल्यांमधील हातभट्टी दारू तसेच २० लिटर क्षमतेचा कॅन असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत पोलीस हवालदार इंदलकर, अनिल वाघमोडे, अस्वले, सुमित बोडरे आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या