मागासवर्गीय मुला-मुलीच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रीया सुरु;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/05/2026 9:37 PM

नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त अधिनस्त मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन-2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहे यशवंतनगर नांदेड, बिलोली,धर्माबाद,मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड,मुखेड,देगलूर,गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड, 125 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर,नायगांव व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहे भोकर, हदगांव, उमरी असे एकूण-16 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
                                                                                                                                                                                                                                                                                                           तसेच गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन अर्ज करावे असे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, शिवानंद मिनगीर व विशेष सामाज कल्याण अधिकारी, गजानन नरवाडे यांनी केले आहे.  शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावयाचा 30 जून 2026 पासून शालेय विद्यार्थी- 7 वी पास विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया अंतिम अर्ज करावयाचा 7 जूलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि इयत्ता  11 वी  तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 31 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर प्रवर्गातील इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार विनामूल्य प्रवेश ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम तसेच इंटरनेट व वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  तरी गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. 

Share

Other News

ताज्या बातम्या