भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभा यात्रा व महाराष्ट्राची गौरव गाथा.

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 13/05/2026 5:07 PM

भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभा यात्रा व महाराष्ट्राची गौरव गाथा.                                       भगूर, गेल्या ४० वर्षापासून भगूर पुत्र क्रांति सूर्य विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचा सोहळा भक्ती भावाने व उत्साहात स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने संपन्न होत असतो, या पूर्वी या सोहळ्यास विचारवंत शिवाजीराव भोसले, डॉक्टर कुमार सप्तर्षी, कथाकथन कार रेखा मुंदडा, सुषमा अंधारे, तसेच अभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव, गिरीश ओक, संजय नार्वेकर, पंढरीनाथ कांबळे, अभिनेत्री अलका कुबल, निर्मिती सावंत खासदार उज्वल निकम, सुरेंद्र गौड, प्रा. लक्ष्मण देशपांडे, उदय साटम, मंगेश चव्हाण, नंदेश उमप, भाऊ कदम, कॉमेडी एक्सप्रेस कलाकार, आदींनी भगूर मध्ये येऊन स्वातंत्र्य वीर सावरकरांना अभिवादन केले आहे, या ही वर्षी हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात संपन्न होणार असून त्या निमित गुरुवार दिनांक २८ मे, रोजी सकाळी ८ वाजता अभिनेते विजय पाटकर, निवास मोरे यांच्या प्रमुख उपस्थित शोभा यात्रा निघणार आहे, या शोभा यात्रेत गुलालवाडी ढोल पथक, पहिलवान प्रवीण पाळदे यांचे मर्दानी खेळ पथक, घोटी येथील विविध गुणदर्शन पथक, भजनी महिला मंडळे व विविध चित्र रथ सामील होणार आहेत, संध्याकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुभदा व अनिकेत जोशी मुंबई निर्मित महाराष्ट्राची गौरव गाथा हा मराठी चित्रपटील गिते व नृत्य यांचा भव्य कार्यक्रम ५०. कलाकार सादर करणार आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ मान्यवर अतिथींच्या उपस्थित संपन्न होणार आहे. पंचक्रोशीतील बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वातंत्र वीर सावरकर जयंती उत्सव समिती भगूर च्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या