*गाडी क्रमांक १६५५३/१६५५४ एसएमव्हीबी बंगळूर - मुंबई एलटीटी - एसएमव्हीबी बंगळूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेस हुबळी, बेळगावी, मिरज,कराड, सातारा, लोणंद,पुणे मार्गे धावणार आहे.*
*१९ मे २०२६ पासून एसएमव्हीबी बंगळूरहून दर शनिवारी आणि मंगळवारी निघेल.*
*२० मे २०२६ पासून मुंबई एलटीटीहून दर रविवारी आणि बुधवारी निघेल*
*ही गाडी बंगलोर होऊन रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी निघेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी मिरज जंक्शन येथे पोहोचेल.*
*कराड येथे दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांनी येऊन १२ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल, सातारा येथे दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी येऊन १ वाजून १० मिनिटांनी सुटेल तर लोणंद जंक्शन येथे दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी येऊन दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सुटेल. पुणे येथे ४ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल व मुंबई एलटीटी येथे रात्री ८: ४० मिनिटांनी पोहोचेल .*
*मुंबई एलटीडी होऊन ही गाडी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी सुटेल ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा मार्गे पुणे येथे पहाटे ३ वाजता येऊन ३ वाजून ५ मिनिटांनी सुटेल लोणंद जंक्शन येथे पहाटे ४ वाजून ४३ मिनिटांनी येऊन ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल सातारा येथे पहाटे ५ वाजून ५७ मिनिटांनी येऊन सकाळी ६ वाजता सुटेल कराड येथे सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी येऊन ६ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल सांगली येथे सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी येऊन ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल मिरज येथे सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांला पोहचेल. व बेंगलोर येथे रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल.*
*या गाडीत ५ जनरल ६ सिल्पर ४ एसी २ जनरेटर कम गार्ड व्हैन अशी एकूण १७ डबे ची एल एच बी गाडी असेल*
तरी मिरज मार्गे बेंगलोर व मुंबई या मार्गावर कायमस्वरूपी ही साप्ताहिक एक्सप्रेस ऐन सुट्टीच्या हंगामामध्ये सुरू झाल्याने याचा प्रवासी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून प्रवाशांनी या गाडीचा भरपूर प्रमाणात लाभ घ्यावा असे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी असे आव्हान केलेले आहे.