रेल्वे प्रशासनाचा सांगलीवर जाचक नियम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/05/2026 9:09 AM

मुंबई-बेंगळुरू नविन एक्सप्रेस गाडीला सांगली स्टेशनवर कमर्शियल स्टाॅप देण्या ऐवजी अजब प्रकारचा तांत्रीक(टेक्निकल) थांबा दिला
प्रवाशांनी सांगली स्थानकावरून चढावे/उतरावे..
अशा थांब्यामुळे सांगलीतील प्रवाशांचे
सांगलीचे उत्पन्न शून्य दिसेल....

सांगली स्टेशनला नामशेष करण्याचा मध्य रेल्वेचे पुन्हा एकदा काळा डाव. 
नागरिक जाग्रुती मंचचा निषेध....

खासदार, आमदार यांनी आवाज उठवून सांगली स्टेशनवर कमर्शियल थांबा द्यावा
- सतिश साखळकर

19 मे 2026 पासून सुरू होणार्या मुंबई-बेंगळुरू एक्सप्रेस 16553/16554 गाडीला बेंगलोरच्या दिशेला जाताना सांगली स्टेशनवर टेक्निकल थांबा दिल्यामुळे सांगली स्टेशनवर चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची कमर्शियल तिकीट विक्रीचे उत्पन्न सांगल ऐवजी ईतर स्टेशनला मिळेल. सांगली रेल्वे स्टेशनची तिकीट विक्री शून्य दिसेल.

सांगली रेल्वे स्टेशन जिल्हा मुख्यालयाचे स्टेशन असल्यामुळे रेल्वे बोर्डच्या नियमाप्रमाणे सांगली स्टेशनवर कमर्शियल थांबा देणे बंधनकारक आहे. तरीही सांगलीत या गाडीला कमर्शियल थांबा न देता टेक्निकल(तांत्रिक) थांबा दिला आहे. हा जाचक निर्णय मध्य रेल्वे पुणे विभागाने घेतला आहे.

हा सांगली जिल्हावर खूप मोठा अन्याय असून आता सांगली जिल्हातील सर्व जनतेने आपल्या जिल्ह्यासाठी पुढे येऊन रेल्वे प्रशासना विरूद्ध आवाज उठवावा.

हे आपण सहन केले सांगली जिल्हाचे नाव रेल्वे नकाशावरून गायब होणार

सांगली स्टेशनची या गाडीची तिकीट विक्री शून्य करण्याच्या कारस्थानामुळे
पुढच्या कुठल्याही नविन गाडीला सांगली स्टेशनवर थांबाच मिळणार नाही

कारण सांगलीची शून्य तिकीट विक्री रेल्वे बोर्डला दाखवली जाईल व नंतर 2-3 महिन्यात मुंबई-बेंगळुरू नविन गाडीचा सांगली थांबा देखील बंद केला जाईल.
त्यानंतर आपण काहीही करू शकणार नाही. आताच जागे झाले पाहिजे.

*दोषी रेल्वे अधिकार्या विरूद्ध सक्त कारवाई करावी*
खासदार व आमदारांनी सांगली जिल्हा विरुद्ध असा जाचक निर्णय घेणार्या रेल्वे अधिकार्या विरूद्ध सक्त कारवाई करून सांगली स्टेशनवर या गाडीला कमर्शियल स्टाॅप मिळवून द्यावे व सांगली जिल्हाला न्याय मिळावा.

सांगली स्टेशनवर गाडी 16554 ला कमर्शियल थांबा द्यावा असे आवाहन नागरिक जाग्रुती मंचचे अध्यक्ष सतिश साखळकर यांनी रेल प्रशासनाला आवाहन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या