नांदेड़ : महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या संकल्पनेतून *Officer of the month व Employee of the month* हा पुरस्कार देण्यात येतो.
त्याअनुषंगाने महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर *महापौर सौ. कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते माहे *फेब्रूवारी २०२६* मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल *Employee of the month* साठी *कनिष्ठ अभियंता उत्तम गुरुनाथ स्वामी* यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापालिकेच्या पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागात कार्यरत असलेले *कनिष्ठ अभियंता उत्तम गुरुनाथ स्वामी* यांनी माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये पाणीपुरवठा व मल्लनिस्सारण विभाग अंतर्गत दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळली तसेच संबंधितांनी अमृत २.० योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेची कामे बऱ्यापैकी मार्गी लावलेली आहेत, तसेच संबंधिताने पूर्ण रमजान महिन्यात चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा केला असून रामनवमी उत्सव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सणासुदीच्या काळात सुद्धा शहरांमध्ये संबंधितानी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे उत्तम नियोजन करून पाणीपुरवठा यशस्वीरित्या करण्यात यश प्राप्त केले असल्याने त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना Employee of the month म्हणून घोषित करून त्यांना महापौर व आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा महाराष्ट्र दिनी सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे *मार्च २०२६* मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल *Employee of the month* हा पुरस्कार क्षेत्रिय कार्यालय क्र.०१ तरोडा येथील कार्यरत *वसुली लिपीक सचिन आनंदराव गजभारे* यांना प्रदान करण्यात आला आहे. साल-सन २०२५-२६ मध्ये एकूण ८५ लक्ष ९७ हजार एवढी विक्रमी मालमत्ता कराची वसुली करून एकूण २८७० एवढ्या मालमत्ता त्यांनी निरंक केल्या त्याचप्रमाणे माहे मार्च मध्ये एकूण ५३ लक्ष ४५ हजार एवढा कर वसुल करून महापालिकेस अधिक उत्पन्न प्राप्त करून दिले असल्याकारणाने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच *एप्रिल २०२६* मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल *Employee of the month* हा पुरस्कार विद्युत विभागात कार्यरत *वरिष्ठ लिपिक श्रीनिवास धर्मीया गडप्पा* यांना प्रदान करण्यात आला आहे. गडप्पा यांनी माहे एप्रिल २०२६ मध्ये विद्युत विभाग अंतर्गत सार्वजनिक पथदिव्यांची दैनंदिन देखभाल दुरुस्ती, ट्रॅफिक सिग्नल दुरुस्ती, मनपा इमारत देखभाल दुरुस्ती, लिफ्ट देखभाल दुरुस्ती तसेच आमदार / खासदार व इतर शासन निधी अंतर्गत कामे उत्कृष्ट पद्धतीने मार्गी लावून महाऊर्जा निधी व सोलार प्रकल्प, एनर्जी सेविंग प्रकल्प इत्यादी कामे त्याचप्रमाणे तारांकित / अतारांकित प्रश्नांची माहिती व इतर माहिती तातडीने व प्रथम प्रधान्याने वरिष्ठांकडे सादर केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी मनपाचे पदाधिकारी व सन्माननीय सदस्य तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्यासह उपायुक्त व इतर विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कनिष्ठ अभियंता उत्तम गुरुनाथ स्वामी, वसुली लिपिक सचिन आनंदराव गजभारे व वरिष्ठ लिपिक श्रीनिवास धर्मया गडप्पा यांचा महापौर व पालिका आयुक्त यांच्या हस्ते सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.