नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने ग्रामगीतेचे प्रणेते, *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महानगरपालिका मुख्यालय येथे त्यांच्या प्रतिमेला *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे* यांनी सुध्दा तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजप्रबोधनाचे हे कार्य पुढे नेण्याचा संकल्प केला. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या साहित्यातून आणि विशेषतः 'ग्रामगीता' या ग्रंथातून ग्रामविकासाचा आणि स्वच्छतेचा जो विचार मांडला, तो आजही तितकाच प्रासंगिक आहे. त्यांच्या "या भारतात बंधुभाव नित्य वसू दे" या प्रार्थनेतून त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा आणि स्वावलंबनाचा वसा अंगीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
याप्रसंगी महानगरपालिकेचे नगरसेविका अमृताबाई बजरंगसिंह ठाकुर, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजीत वायकोस, नितीन गाढवे, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे, कार्यालय अधिक्षक पद्माकर कावळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.