स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/05/2026 8:21 AM

नांदेड:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आज उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या शुभहस्ते प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कुलगुरू डॉ. चासकर यांनी पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर‘वंदे मातरम्’चे सादरीकरण करून ध्वजारोहण पार पडले. पुढे राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रसंगी प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत
बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेत उपस्थितांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विद्यापीठ परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या