नांदेड - नांदेड जिल्हा परिषदेत आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांच्यासह विविध विभागांचे खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.