सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्याला घेराव घालणार : राहुल साळवे

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/04/2026 9:04 PM

नांदेड :-  जिल्हासह महाराष्ट्रातील दिव्यांगांना अधिकारी कर्मचाऱ्यांनी व आमदार खासदारांनी कायद्यात तरतूद केलेल्या योजनांची अंमलबजावणी न करता दिव्यांगांचा निधी वेळेत खर्च करत नसून दिव्यांगांवर उपासमारीची वेळ येत आहे. वारंवार निवेदने देऊन तक्रारी करून आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुणही आमदार खासदार अधिकारी हे कुठल्याच प्रकारची दखल घेऊन आदेश काढत नसल्यामुळे दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांना सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने घेराव घालून विविध मागण्याचे निवेदन सादर करणार असल्याचे सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी जिल्हाधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनामध्ये लेखी स्वरूपात दिले आहे. 
सविस्तर वृत्त असे की, 
दिव्यांगांना राज्य व केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजनांची पुरेपूर अमंलबजावणी होत नसल्याने व खासदार आमदारांनी निधी खर्च केला नसल्याने सकल दिव्यांग संघटना व दिव्यांग नाराज आहेत. त्यातच गत दोन ते तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन रखडले आहे, स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था कडील दिव्यांगांचा राखीव ५ टक्के निधी वेळेवर खर्च न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण मंत्री हे महाराष्ट्र दिनी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांना सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने घेराव घालून 
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्वराज्य संस्थामधील दिव्यांगांचा राखीव ५ टक्के निधी त्वरित खर्च करावा, आपले सरकार सेतू सेवा केंद्र दिव्यांगांना बहाल करण्यात यावे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल मधील जाचक अटी रद्द करून त्याची तारीख वाढवून देण्यात यावी.
कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती पुन्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग मंत्रालय मुंबई येथे सचिव पदी नियुक्ती करावी.
आमदार खासदार यांच्याकडील निधी त्वरित खर्च करण्यात यावा. दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचे शिधापत्रिका त्वरित देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना घेराव घालून देण्यात येणार आहे आणि या संदर्भातच आज सकल दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन केले आहे

Share

Other News

ताज्या बातम्या