नांदेड :- जागतिक तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. जगातील अति उष्ण पंधरा शहरांपैकी एकट्या भारतातील दहा शहरे त्यात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात विदर्भासह मराठवाड्यातील अनेक शहरे अक्षरशः उष्णतेमुळे होरपळून निघत आहेत. तापमानाचा पारा जवळजवळ 46 अंश डिग्री पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे प्रचंड दाहकता जाणवत आहे. तपमान 50 डिग्री सेंटीग्रेडच्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आत्तापर्यंत सात जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.*
*माझ्या प्रिय नागरिकांनो, आपण सध्याच्या जे काही तपमानाचे प्रादुर्भाव अनुभवत आहोत, ते नेहमीच्या उन्हाळ्या सारखे खचितच नाहीत. येणाऱ्या संभाव्य तजीव घेण्या वाढत्या तपमानाचे हे संकेत आहेत. एक प्रकारे वाढत्या तापमानाच्या धोक्याचा अर्थात प्रदीर्घकाळ तापमानाच्या स्थिर लाटेचा इशाराच आहे.*
*भारतीय नागरी संरक्षण विभाग हवामान खात्या च्या अहवालानुसार २९ एप्रिल (आजपासून)ते १२ मे २०२६ पर्यंत तर युद्ध जन्य अर्थात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.*
*याला आपण एक प्रकारचा "अनैसर्गिक निसर्ग प्रकोप"म्हणता येईल.*
*याला एक प्रकारची " अनैसर्गिक नैसर्गिक आणीबाणी" अर्थात "जीवघेणी तीव्र स्थिर उष्णतेची लाट" म्हणता येईल. यात "एल निनो" चा आपत्तीजनक प्रादुर्भाव असू शकतो.*
*.................................................*
*"पण घाबरून जाण्याचे कारण नाही..!* *फक्त सतर्कतेची तथा अति दक्षता घेण्याची आवश्यकता आहे..!!*
*.................................................*
*संभाव्य येणारी परिस्थिती निरोगी व्यक्तींना सुध्दा अत्यंत धोकादायक ठरू शकते. उष्मा घाता सारखे (सनस्ट्रोक/ हीटस्ट्रोक) प्रकार अनपेक्षित पणे कुणालाही होऊ शकतात. उन्हाचा तडाखा तथा चटका कुण्याही व्यक्तीला बसू शकतो. "उन्हात घराबाहेर जाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणे" आहे असे म्हणता येईल. पाळीव तथा वन्य पशु पक्ष्यांनाही या परिस्थितीचा धोका होऊ शकतो. प्रखर उन्हामुळे वाहने व जंगले पेट घेऊ शकतात. आगी लागू शकतात. पण त्यातल्या त्यात लहान बालके,ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता, उघड्यावर शेतीकाम, रस्त्याचे खोदकाम व गिट्टी कामगार, वीटभट्टीवर काम करणारे कामगार,तसेच दीर्घ आजाराने प्रतिकार शक्ती कमी झाल्याने, दीर्घ आजाराने पीडित व्यक्ती जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, प्फुफुसाचे आजार,दमा, मूत्रपिंडाचे आजार, हृदय रोगाचे आजार, मेंदूचे आजार,क्षय,रक्तक्षय, कर्क रोग, तसेच दीर्घ कालीन असंतुलित आहार व शरिरातील पाण्याची कमतरता आदी आजाराने पीडित व्यक्तींना याचा जास्त धोका होऊ शकतो.अशा परिस्थिती सडकी फळे,शिळे अन्न,समारंभातील अन्नातून विषबाधा होण्याचीही दाट शक्यता असते.पर्जन्य पूर्वानुमान चूकू शकते.*
*--------------------------------*
*काय काय करावे? काय काय करू नये..!*
*--------------------------------*
*सर्वांनी आपले व आपल्या कुटुंबीयांचे जीव वाचवण्यासाठी लगेचच या गोष्टी निक्षून पाळाव्यात.*
*१) सकाळी साडेनऊ ते दहा च्या आतच आपली दिवसभराची घरा बाहेरची अत्यावश्यक कामे उरकून घ्यावेत. सकाळी 10 ते संध्याकाळचे चार वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडण्याचे आवर्जून टाळावे.*
*२)बाहेर जाणे अत्यावश्यक च असेल, टाळता येणे शक्यच नसेल तर अंगावरती सुती तथा खादीचे पांढरे शैल कपडे परिधान करून, डोक्यावरून व कानावरून गमचे,रुमाल, फिरंगी टोपी व स्त्रियांनी डोक्यावरून भरून पदर तथा ओढणी, छत्र्यांचा वापर करून,डोळ्यावर उन्हाळी शितल चष्मे वापरून सावलीत थांबे घेत घेत, पाणी पीत पीत अपेक्षित जागी पोहोचावे. पोहोचल्यानंतर पंख्याच्या तथा मोकळ्या हवेत बसावे. भरपूर पाणी प्यावे. तहान लागण्याची वाट न पाहता थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहावे.पण आपल्या जिवापेक्षा कुठलेच काम महत्वाचे नाही हे प्रथम लक्षात असू द्यावे.*
*३) सर्वात धोकेदायक वेळ सकाळी 10 ते दुपारी तीन वाजेपर्यंत असल्याकारणाने शाळा, महाविद्यालये व प्रशासकीय कार्यालयीन व्यवस्थापनाने कामकाजाचे वेळापत्रक बदलावे.यावेळेत कार्यालयाला सुट्टी द्यावी व सकाळ,संध्याकाळ व रविवारी सुद्धा काम घेता येईल.*
*४) काळ्या रंगाची तथा गडद रंगाची, तंग कपडे अंगावर परिधान करू नयेत. पांढऱ्या रंगाची सुती तथा खादीची पुना पॅन्ट, नेहरू शर्ट, तथा गांधी टोपी अशी ढिली व डगळी कपडे वापरावीत.*
*५) उष्मा घाताची अर्थात हीट स्ट्रोकची किंवा सन स्ट्रोकची लक्षणे उदाहरणार्थ तीव्र डोकेदुखी, गर गरणे, भोवळ येणे, कमालीचा अशक्तपणा येणे, घाम न येणे, त्वचा व घसा कोरडा पडणे, अंधूक दिसणे,भ्रांत जाणे, बेशुद्ध अवस्था येणे ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण तोपर्यंत कपडा पाण्यात ओला करून त्या व्यक्तीचे सर्वांग ओल्या कपड्याने पुसून,माथ्यावर व डोक्यावर चार- सहा पदरी ओल्या कपड्याची घडी करून ठेवावी व त्या व्यक्तीला सावलीत पंख्याच्या हवेला तथा मोकळ्या हवेत ठेवून वारंवार पाणी पाजत रहावे, मीठ- साखर- लिंबू-पाण्याचे द्रावण करून प्यायला भरपूर द्यावे, एवढे करावे.शरिरात केवळ पाण्याचे प्रमाण कमी पडल्या मुळे शरिराचे तपमान वाढते,ताप येतो.*
*५) उष्णतेच्या प्रचंड दाहकते मुळे डोळे कोरडे पडणे,लाल होणे, कचकच करणे, जंतूच्या प्रादुर्भावा मुळे डोळ्याभोवती सूज येणे, यालाच "ड्राय आय सिंड्रोम" असे म्हणतात.असे आढळून आल्यास तात्काळ नेत्र रोग तज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.*
*६) इतर भटक्या,मुक्या प्राण्यांसाठी जागोजागी पाणी पिण्याची व्यवस्था करावी.जगा.जगू द्या आणि जगवा हे तत्व पाळावे.*
*७) परिसराचे व हवामानाचे तपमान 45 ते 47 अंश डिग्री सेंटीग्रेड च्याही पुढील वाढी मुळे सर्प, विंचू,हिंस्त्र पशू थंड ठिकाणी येऊन बसण्याची दाट शक्यता असल्यामुळे सावधानता बाळगावी.सावध रहावे.*
*८) आपली वाहने शक्यतो सावलीतच ठेवावीत. दिवसाचा प्रवास शक्यतो टाळावाच. पेट्रोल तथा गॅसवर चालणारे वाहने असतील तर विशेष दक्षता बाळगणे अतिशय आवश्यक आहे. गॅसची टाकी उघड्यावर, उन्हात ठेवू नका.पेट्रोलची टाकी पूर्ण भरू नका. हवेसाठी थोडी मोकळी जागा असू द्या. गाडीच्या काचा पूर्णतः घट्ट बंद करू नका. थोड्याशा उघड्या ठेवा.बंद गाडीत लहान मुलांना एकटे ठेऊ नका. घरातील हवा खेळती राहावी म्हणून दारे- खिडक्या, तावदाने उघडी ठेवा.*
*९) जेवणात दही, ताक,मठ्ठा, विड्याच्या पानाचा रस, शक्य असल्यास सर्वसाधारण थंड लस्सी, उसाचा रस, फळांचा रस, शरबत,जलयुक्त फळे अर्थात कांदा, टरबूज, खरबूज, पपई, द्राक्ष अशी जल युक्त फळे भरपूर खा.*
*१०) मोबाईल फोनचा वापर वचार्जींग शक्यतो कमीत कमी करा. अति उष्णतेमुळे स्फोट होण्याचा अति धोका आहे.*
*११) गॅसची उप करणे, लाईटर्स, कार्बन युक्त प्येय, सुगंधी स्प्रे व बॅटरी, आणि आग पेटी इत्यादी आपल्या गाडीत ठेवू नका.*
*घाबरू नका.! गडबडून जाऊ नका, हुरळून जाऊ नका.!!भिऊ नका.!!! स्वत: ला व कुटूंबाला सांभाळा. दक्ष रहा. पुरेशी दक्षता घ्या. भारतीय नागरी संरक्षण विभाग हवामान खात्याने व मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेल्या आणि या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करा आणि सुरक्षित रहा!आनंदी रहा