नांदेड :- नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी 02 पोलीस निरीक्षक, 01 कार्यालयीन अधीक्षक, 01 पोलीस उपनिरीक्षक, 03 ग्रेडपोउपनि, 04 पोलीस अंमलदार असे एकुण 11 अधिकारी व अंमलदार हे नियत वयोमानानुसार दिनांक 30.04.2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड शहर, यांचे हस्ते आज सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला. सर्व सेवानिवृतांनी आपल्या कुटूंबास वेळ द्यावा आणि आरोग्यांची काळजी घेवून सुखी आणि आनंदी जिवन जगण्याचा सल्ला मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिला. सदर कार्यक्रम मंथन हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पार पडला सेवानिवृत्त समारंभास श्री जगदीश मंडलवार, पोनि पोलीस कल्याण विभाग, नांदेड यांचेसह अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोहेकॉ / 2475 मोरे, नेम.ए.एच. टी.यु शाखा नांदेड, यांनी केले असुन, पोहेकॉ / 1752 हनमंत पोतदार, पोकॉ/ मारोती कांबळे, नरेंद्र राठोड पीआरओ कार्यालय, मपोकॉ/ सविता भिमलवाड, पोलीस कल्याण विभाग यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे केले आहे.