विकास सूर्यवंशी, विजय पारगे व रघुनाथ कांबळे यांची राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेवर निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/04/2026 2:49 PM

**- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग बैठक संपन्न 
         महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यस्तरीय पदावरती पश्चिम महाराष्ट्र विभागातून विकास सूर्यवंशी सांगली, विजय पारगे पुणे व रघुनाथ कांबळे कोल्हापूर यांची निवड करण्यात आली. सातारा येथे राज्य संघटनेचे जे सल्लागार शिवगौंड अण्णा खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली बैठकीस पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यातील राज्य संघटनेचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. सांगली जिल्हा राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून सचिन चोपडे यांची निवड जाहिर करण्यात आली.
     महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या राज्यभर संपर्क व सल्गनता असणाऱ्या एकमेव अशा शिखर संघटनेची पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक विभागातून राज्य संघटनेचे पदाधिकारी निवडले जात आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर राज्याच्या सात विभागातून निवडलेल्या केंद्रीय व्यवस्थापन समिती सदस्यांमधून राज्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस व खजिनदार निवडले जाणार आहेत. या अंतर्गत संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पत्रकार भवन सातारा येथे गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार शिवगोंडआण्णा खोत इचलकरंजी हे होते. यावेळी राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकारी निवड कार्यक्रमांतर्गत पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये राज्य संघटनेच्या केंद्रीय व्यवस्थापन  समिती सदस्य पदी विकास सूर्यवंशी सांगली, राज्य संघटना  उपाध्यक्षपदी विजय पारगे पुणे तर संघटन सचिव पदी रघुनाथ कांबळे कोल्हापूर, अरुण निवंगुणे पुणे राज्य संघटना सल्लागार पदी निवड करण्यात आली. सांगलीतून मारुती नवलाई यांचीही राज्य संघटनेवर निवड करण्याची विनंती करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. राज्य कार्यकारणी सदस्य पदी सांगली जिल्ह्यातून सचिन चोपडे, सातारा जिल्ह्यातून राजेंद्र माळी व  गणेश पवार, सोलापूर जिल्ह्यातून अंबादास शिंदे व उत्तम चौगुले, कोल्हापूर जिल्ह्यातून आण्णा गुंडे (इचलकरंजी), पुणे जिल्ह्यातून दत्तात्रय पिसे यांची राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड जाहीर करण्यात आली.
            यावेळी कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, अंकुश परब, परशराम सावंत कोल्हापूर,  पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटना इचलकरंजीचे शिवानंद रावळ, पुणे संघटनेचे यतीन चौधरी, यशवंत वाधवणे, राजेश रसाळ, अविनाश जगताप, अमित जाधव, संजय फाटक अमोल साबळे, राहुल चिंचकर उपस्थित होते.
   राज्य संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार शिवगौंड अण्णा खोत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले, राज्य संघटनेची सभासद संख्या वाढली पाहिजे. सरकार दरबारी दबाव टाकण्यासाठी सभासद नोंदणी जास्त असणे आवश्यक आहे. स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी रस्त्यावरची लढाई करावी लागणार असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वांची तयारी हवी. 
विकास सूर्यवंशी यांनी सांगितले की,  राज्य संघटनेने सदस्य नोंदणीसाठी स्वतंत्र ॲप सुरू केले असून या नोंदणी प्रक्रियेमध्ये स्थानिक संघटनेला पूर्ण अधिकार व स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. त्याचा वापर करून आपल्या गावातील, शहरातील व तालुक्यातील प्रत्येक एजंट व वृत्तपत्र विक्रेता राज्य संघटनेला जोडावा. त्यांना सभासद करावे. ग्रामीण भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सुटावे असे वाटत असतील तर ग्रामीण भागातील लोकांनी एकत्र यायला हवे. त्यांना राज्य संघटना म्हणून राज्य संघटनेचे जिल्ह्यातील प्रतिनिधी तसेच पदाधिकारी चांगली ताकद देतील. रघुनाथ कांबळे यांनी सांगितले, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी निवडताना पश्चिम महाराष्ट्राला न्याय मिळायला हवा. अध्यक्ष पदासाठी महत्त्वाचे पद पश्चिम महाराष्ट्राला मिळायला हवे. संघटनेची सभासद संख्या वाढली पाहिजे. विजय पारगे पुणे यांनी सांगितले, पुणे येथे वृत्तपत्र विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. संघटित ताकद मोठी आहे, याचा फायदा नक्कीच राज्य संघटनेला होईल. राज्य संघटनेचे काम व वृत्तपत्र विक्रेत्याच्या हितासाठी पुणे जिल्हा संघटना नेहमी पुढाकार घेईल. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एजंटांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न यापुढे करणार आहे. आनंद रावळ इचलकरंजी म्हणाले, राज्य संघटनेच्या वतीने सरचिटणीस, अध्यक्ष यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे. स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासंदर्भात जिल्हाधिकारी, आमदार व खासदार यांना निवेदन देण्याचे काम सर्वांनी पूर्ण करायला हवे. पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रत्येक आमदारापर्यंत आपली मागणी पोहोचली पाहिजे तरच आपल्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित होण्याचा मार्ग सुकर होईल.
       या बैठकीचे आयोजन नियोजन सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष व राज्य संघटनेचे प्रतिनिधी राजेंद्र माळी, गणेश पवार, ताजुद्दीन आगा, गणेश पवार, भास्कर भोरे, लहुराज लवळे, हमीद खान यांनी केले. राज्य संघटनेचे सातारा प्रतिनिधी राजेंद्र माळी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या