नुतन आयुक्तांचे स्वागत आणि सांगलीच्या विकासासाठी 'लोकहित मंच 'सज्ज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/04/2026 10:31 AM

​सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तपदी मा. संजिता मोहपात्रा यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे 'लोकहित मंच, सांगली' कडून मनःपूर्वक स्वागत!
​शहराच्या विकासासाठी नूतन आयुक्तांकडून सांगलीकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषतः मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकीत वसुली जोमाने करणे अत्यंत गरजेचे आहे. वसुली वाढली तरच शहराच्या विकासकामांना गती मिळेल.
​आमच्या प्रमुख मागण्या आणि अपेक्षा:
✅ कर वसुलीत वाढ: घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवून महापालिकेचे उत्पन्न वाढवणे.
✅ अतिक्रमण निर्मूलन: शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करणे.
✅ स्वच्छ सांगली: शेरीनाला शुद्धीकरण आणि कृष्णा नदी प्रदूषणाबाबत ठोस पावले उचलणे.
✅ मूलभूत सुविधा: रस्ते रुंदीकरण, चौकांचे सुशोभीकरण आणि नवीन इलेक्ट्रिकल बससेवा सुरू करणे.
​आम्हाला विश्वास आहे की, राजकीय दबाव झुगारून आयुक्त महोदया शहराला शिस्त लावतील आणि विकासाचा नवा पॅटर्न राबवतील. 🛑🏗️
​- मनोज भिसे
(लोकहित मंच, सांगली)

Share

Other News

ताज्या बातम्या