नांदेड :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सामाजिक समता सप्ताह दिनांक 08 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यता येत आहे. त्या अनुषगांने आज दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रथमत: मान्यवराच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमा पुजन करुन दिपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरवात करण्यात आली.
तद्नंतर प्रमुख पाहुणे म्हणून आय्.डी.बी.आय बँक मॅनेजन बैनवाड रामकिशन, यांना समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देवून सन्मानीत करण्यता आले.
सदर कार्याशाळाचे अध्यक्ष श्री गजानन नरवाडे ,समाज कल्याण अधिकारी नांदेड होते व प्रमुख पाहुणे म्हणुन आय्.डी.बी.आय बँक मॅनेजन रामकिशन बैनवाड व माधवी राठोड वरीष्ठ समाज कल्याण निरिक्षक तसेच लक्ष्मी गायके वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक हे उपस्थित होते .
सदर कार्यशाळेचे प्रस्तावीक लक्ष्मी गायके वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांनी केले असून प्रस्तावीकेत त्यांनी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील सहभागी 40 ते 50 लाभार्थी यांना मनी मर्जीन चे महत्व सांगून मार्गदशन केले व समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली .
तद्नंतर बँक मॅनेजन बैनवाड रामकिशन यांनी उपस्थित नवउद्योजक यांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत महाराषट्र राज्याच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक लाभार्थी यांना 15% मार्जीन मनी उपलब्ध करुन देण्यात येते व बाबत सविस्तर माहिती देवून तळागाळातील उपस्थित नवउद्योजक यांना सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले .
केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळे अंतर्गत कार्याक्रमाचे अध्यक्षीय समारोपात समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, यांनी नवउद्योजकांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत महाराष्ट्राराज्यातील अनुसूचित व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10% स्व- हिस्सा भारणा केल्या नंतर व बँकेने अर्जदारास स्टँडॲप इंडिया योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत 15% मार्जीन मनी राज्य शासनार्फत देण्यात येते अशी महत्वपूर्ण माहिती देवून नवउद्योजकांना मार्गदर्शन केले .
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राणी गडगीळे, समाज कल्याण निरिक्षक यांनी केले तर सुत्र संचालन अंजली नरवाडे तालूका समन्वयक यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समाज कल्याण निरीक्षक संजय कदम यांनी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्ररिश्रम घेतले
सदर एक दिवशीय केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळा मा. श्री. शिवानंद मिनगीरे ,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .