राज्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी वाल्यांचे ऑडिट करण्यात आले पाहिजे ग्राहकांनी बुकिंग केले नसले तरी त्यांच्या नावावर गॅस विकण्यात आलेले आहेत आता लक्ष्यात येत आहे.
काही ग्राहकांकडे एक कनेक्शन काही ग्राहकांकडे दोन कनेक्शन अशा पद्धतीने वर्षाला 24 सिलेंडर लागतात मात्र ग्राहक दहा ते पंधरा सिलेंडर वापरतात राहिलेले व न वापरलेले सिलेंडर एजन्सी धारक ब्लॅक ने हॉटेल व्यवसायिक व व्यावसायिक वाहनांसाठी विकत असतील असा अंदाज आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने सर्व गॅस एजन्सी चे गेल्या तीन वर्षाचे ऑडिट करावे बरेचसे भानगडी उघड होतील.
कारण बऱ्याचश्या ग्राहक आणि डिसेंबर नंतर बुकिंग केलेले नाही मात्र आत्ता बुकिंग घेतले जात नाही याचा अर्थ त्यांच्या नावावर एजन्सी धारक आणि परस्पर गॅस सिलेंडर विकले आहेत.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत राज्यस्तरावर कारवाई करावी बराचसा लोड कमी होईल.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.