अर्धापूर :- राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका अर्धापूर च्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 649 वी जयंती दिनांक 22 फेब्रुवारी रोजी अर्धापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता ध्वजारोहण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.यावेळी धर्मराज देशमुख, प्रवीण देशमुख सौ.वैशाली प्रवीण देशमुख नगराध्यक्ष यांच्या सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंती निमित अर्धापूर शहरातील तामसा कॉर्नर पासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी माधवराव गायकवाड राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेशाध्यक्ष,संजय सोनटक्के प्रदेशसचिव,के.के. गंगासागरे नांदेड महानगरध्यक्ष,गजानन जोगदंड जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर, नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष रवी गंगासागरे, गोविंद माऊली पार्डीकर, अर्धापूर तालुका अध्यक्ष बालाजी गंगासागरे,तालुका उपाध्यक्ष संतोष वाघमारे, शिवाजीराव सोनटक्के,तानाजी सोनटक्के, अर्धापूर शहराध्यक्ष रवी साखरे, पुंजाजी विनकरे, संतोष गायकवाड,उपाध्यक्ष युवा पुंजाजी विनकरे,कचरू जोगदंड, होनाजी जोगदंड, केशव जोगदंड,गणेश विनकरे, बालाजी सोनटक्के,सुनील पतंगे,रोहिले ,अरविंद सोनटक्के ,मारुती सोनटक्के ,केशव सोनटक्के,प्रभाकर साखरे ,सुनील साखरे, लक्ष्मण साखरे, गजानन साखरे ,सचिन गंगासागरे ,गजू करो यांच्या सह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.