आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/02/2026 4:27 PM

नांदेड :- जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र (सेतू) देण्यासाठी नांदेड जिल्हा सेतू समितीमार्फत 13 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. 

याबाबत 14 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. या जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी अर्जदारांनी आपले सरकार सेवा केंद्रासाठी शनिवार 28 फेब्रुवारी 2026 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव नांदेड जिल्हा सेतू समितीचे सदस्य सचिव किरण अंबेकर यांनी केले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या