मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानपर्यंत रस्ता अतिशय खराब झाला आहे महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. मात्र केवळ एका पावसाळ्यात या रस्त्याची आणि हा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराची औकात दिसून येते.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानपर्यंत हा रस्ता ट्रिमिक्स करावा अशी मागणी मिरज सुधार समितीने अनेक वेळा महापालिकाकडे केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात वंटमुरे कॉर्नर ते झारी चौक पर्यंत रस्ता करण्यासाठी 45 लाख रुपयांच्या निधीची निविदा प्रसिद्ध केली आहे या रस्त्याच्या दर्जावर मिरज सुधार समिती विशेष लक्ष देऊन राहणार आहे. कारण मिरज आणि सांगली शहराला जोडणारा हा रस्ता असल्याने या रस्त्याच्या दर्जाबाबत मिरज सुधार समिती आग्रही आहे.
रविवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते समन्वयक, शंकरतात्या परदेशी, उपाध्यक्ष तौफीक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, असिफ निपाणीकर, सुरेश झेंडे, दिनेश तामगावे, अमीर डांगे, शब्बीर बेंगलोरे, सुभान सौदागर आदी सदस्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याच्या दर्जाबाबत ठेकेदार आणि महापालिका प्रशासनासोबत संवाद साधून काम करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे अध्यक्ष नरेश सातपुते यांनी सांगितले.