कुपवाडच्या नवयुवकाची व्यवसायाकडे वाटचाल, महापौर, उपमहापौरांनी दिल्या शुभेच्छा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/02/2026 6:56 AM

     आपल्या कुपवाड शहरातील नागनाथ व्हनकडे यांनी सांगली 'आर सिटी माॅल ' येथे 'दिगंबरा इम्पेक्स’ या शाॅपचा चा भव्य उद्घाटन सोहळा महापौर धिरज सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला. व्यवसायाच्या या नवीन वाटचालीस आणि दिगंबरा इम्पेक्स संपूर्ण टीमला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मा. गजानन मगदूम यांची उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
#याप्रसंगी महापौर सुर्यवंशी, मोहन व्हनखंडे सर, नगरसेवक सागर वनखंडे माजी नगरसेविका अनिता व्हनखंडे वहिनी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या  सर्वांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संगीत मैफिल आमचे मार्गदर्शक सरोज बाबर सर यांनी केले तसेच नियोजन नागनाथ व्हनकडे व मित्रपरिवार यांनी केले असेच कुपवाड शहरातील युवकांनी व्यवसायात नव नवीन संधी शोधावी यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या