माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण याना नरेंद्र–देवेंद्र महोत्सवा’त पंडीत दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान तर्फे 'नांदेड भुषण पुरस्कार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/02/2026 6:13 PM

नांदेड :- राज्य आणि देशपातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक सन्मान मिळाले,तरी आपल्या मातीत, आपल्या लोकांकडून मिळणारा सन्मान हा कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असतो, असे मनोगत नरेंद्र–देवेंद्र महोत्सवा’त पंडीत दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘नांदेड भूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. निराधाराच्या जीवनात आनंद मिळावा यासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांना आनंदाची बातमी मी लवकरच देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.*

शहरातील नवा मोंढा मैदानात चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, कुबेरनगरी, मौजे लोंढेसांगवी प्रस्तुत ‘नरेंद्र–देवेंद्र महोत्सवा’त टाळ्यांच्या गजरात हा भव्य सन्मान सोहळा पार पडला.यावेळी उपस्थित नागरिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ते असे म्हणाले की, “माझ्याच गावात, माझ्याच लोकांनी केलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. नांदेडकरांनी मला मनापासून दिलेली ही पावती आहे.” सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अॅड. दिलीप ठाकूर यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. “देवदर्शनापासून सर्वसामान्यांच्या प्रश्नांपर्यंत त्यांनी सातत्याने काम केले आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच समाजाला दिशा मिळते,” दिलीप ठाकूर यांच्या पाठीशी मी खंबीर पणे उभा असल्यामुळे येथून पुढे त्यांचे सर्व कार्यक्रम आणखी भव्य होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनपा तर्फे पूर्वी प्रमाणे दिलीप ठाकूर यांच्या कविसंमेलनासाठी आर्थिक साहाय्य करावे अश्या सुचना त्यांनी महापौरांना दिल्या.मनपा निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “सर्व विरोधक एकीकडे असतानाही जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला. नांदेडकरांनी नेहमीच प्रगतीच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.” 
संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, मान पत्र, महावस्त्र व रोख रू. 11000 देऊन खा. चव्हाण यांना नांदेड भूषण देण्यात आला.

स्वागतध्यक्ष शिवप्रसाद राठी यांनी व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री डी. पी. सावंत, भाजपा शहराध्यक्ष अमर राजुरकर, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर, किशोर स्वामी, भुजंगराव पाटील डख, डॉ. अंकुश देवसरकर, अॅड. महेश कनकदंडे, प्रवीण साले, सतीश शर्मा, सुरेश लोट ,अंबादास लालपोतू, दिलीपसिंग हजारी, सतीश देशमुख, संजय रातोळीकर यांचा सत्कार केला.यावेळी हजारो रसिकांची उपस्थिती होती. 
     संयोजक अॅड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविकात खा. चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला. “नांदेडचेच नव्हे, तर मराठवाडा आणि महाराष्ट्राचे भूषण म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना यापूर्वीच हा पुरस्कार मिळायला हवा होता. मात्र आज तो योग जुळून आला,” असे ते म्हणाले. खा. चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारल्याने ‘नांदेड भूषण’ सन्मानाची उंची अधिक वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.यापुढे कवी संमेलनासाठी प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना आमंत्रित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. हा सोहळा अधिक भव्य आणि यशस्वी व्हावा, यासाठी राजाश्रयाची गरज असल्याचे सांगत, मनपामार्फत किमान पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.सूत्रसंचालन संतोष देवराय तर आभार दिनेशसिंह ठाकूर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल खांडील,राजू मोरे, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, अरुण काबरा, जगतसिंह ठाकूर, संतोष परळीकर, रोहित ठाकूर, प्रभुदास वाडेकर, महेंद्र शिंदे, विलास जोगदंड,रोहित ठाकूर यांनी परिश्रम घेतले. एकंदरीत, ‘नांदेड भूषण’ पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खा. अशोकराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या