नवी मुंबई : कामगार विरोधी धोरणाणाची पहिली ठिणगी मुंबईत..??

  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 25/09/2020 11:40 PM

नवी मुंबई : केंद्र सरकारने कामगार धोरण विषयक विधेयक मंजूर करून अवघे दोन तिनही दिवस उलटले नाहीत तेच खासगी कंपन्यांनी आपले काही विभाग बंद करून कायम स्वरूपी कामगारांना घरचा रस्ता दाखवला आहे. मुंबईतील मरोळ औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत असलेल्या टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीने पाॅवर विभाग बंद करून कामगारांना कायम स्वरूपी घरी बसण्याची नोटीस बजावली आहे. अगोदरच कोरोना कोविड-१९ महामारीच्या पार्श्र्वभूमीवर करोडो लोक बेराजगार झाले आहेत.त्यांत केंद्र सरकारचे हे खासगी कंपन्यांनी कायम स्वरूपी कामगारांना घरी बसविणे म्हणजेच लोकांना बेरोजगारीच्या खाईत लोटून त्यांच्या बेरोजगारीच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखेच आहे. कामगार  संघटनांनी या विधेयकाला कडाडून विरोध करणे केंव्हाही कामगार हिताचेच ठरले. आता उत्सूकता आहे ती कामगार संघटना याबाबत कोणती निर्णायक भूमिका घेतात..?? ते पाहण्याची.

Share

Other News

ताज्या बातम्या