धुळीचे साम्राज्य : सांगली आणि कोलापूर रोड रस्ते बनले श्वसनासाठी घातक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/02/2026 7:15 PM

सांगली/कोल्हापूर: सध्या सांगली शहर आणि परिसरातील रस्ते धुळीने पूर्णपणे माखले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हीच भीषण परिस्थिती आता कोल्हापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवरही पाहायला मिळत आहे.
​सांगलीतील भयावह स्थिती
​सांगलीतील काळी खण परिसर, साखर कारखाना परिसर आणि टिंबर एरियामधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या भागातील रस्ते सध्या धुळीच्या जाड थराखाली गाडले गेले आहेत. विशेषतः सायंकाळच्या वेळी धुळीचे लोट हवेत पसरत असल्याने वाहनधारकांना रस्ता दिसणे कठीण होत आहे.
​धुळीची प्रमुख कारणे:
​रस्त्यांची दुरवस्था आणि साचलेली माती.
​वाहनांचा वाढता धूर.
​साखर कारखान्यातून पडणारे काजळीचे बारीक कण.
​कोल्हापूर रस्त्यावरील हाल
​सांगलीप्रमाणेच कोल्हापूर रस्त्याची अवस्थाही चिंताजनक आहे. जड वाहनांची सततची वर्दळ आणि रस्त्याकडेला साचलेली खडी-माती यामुळे हा मार्ग 'धुळीचा महामार्ग' बनला आहे. यामुळे प्रवाशांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांचे विकार जडत आहेत.
​नागरिकांची मागणी: प्रशासनाने तातडीने रस्त्यांवरील माती उपसावी आणि धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमितपणे पाणी फवारणी करावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल.


​आपला नम्र,
​मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या