आगामी काळात येणाऱ्या मोठ्या सण-उत्सव व जयंतींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने जामखेड पोलीस स्टेशन व रॅपीड अॅक्शन फोर्स (RAF) यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहरातील महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक सो. सोमनाथ घागे,
मा. अपर पोलीस अधीक्षक सो. वैभव कलुवमें,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. प्रविणचंद लोखंडे
यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 06/02/2026 रोजी दुपारी 14.00 ते 15.00 या वेळेत हा रूट मार्च आयोजित करण्यात आला.
या रूट मार्चमध्ये सीआरपीएफ / रॅपीड अॅक्शन फोर्सचे ACP विशाल विन्नर यांच्यासह अन्य 02 अधिकारी व 37 जवान सहभागी होते. तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक वषांचाई जाधव,
पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे,
पोलीस हवालदार दिनेश गंगे, प्रकाश जाधव, महादेव मिसाळ,
पोलीस नाईक ज्ञानेश्वर बेलेकर, दत्तु बेलेकर, योगेश दळवी
व इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते.
रूट मार्चदरम्यान जामखेड शहरातील संवेदनशील ठिकाणे, शाळा-महाविद्यालये तसेच शहराची भौगोलिक परिस्थितीची पाहणी करण्यात आली.
हा रूट मार्च जामखेड पोलीस स्टेशन, बीड कॉर्नर, खर्डा चौक, तपनेश्वर रोड, मिलिंद नगर, नूराणी कॉर्नर, खाडे नगर, बस स्टँड, सदाफुली वस्ती, खंडोबा वस्ती, मेन पेठ, जय हिंद चौक ते खर्डा चौक, जामखेड या मार्गावरून काढण्यात आला.
या संयुक्त रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.
(दशरथ चौधरी)
पोलीस निरीक्षक
जामखेड पोलीस स्टेशन