सांगलीच्या विकासासाठी नवा संकल्प, नुतन महापौर व उपमहापौरांसमोरील आव्हाने आणि लोकहित मंचची भूमिका !!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/02/2026 10:34 AM


​नमस्कार सांगलीकर,
​सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी श्री. गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ही निवड शहराच्या विकासाला नवी गती देणारी ठरो, हीच अपेक्षा.
​महानगरपालिकेची विस्कळीत झालेली आर्थिक आणि प्रशासकीय 'घडी' पुन्हा बसवणे, हे नूतन कारभाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. केवळ घरपट्टी आणि पाणीपट्टीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे आता काळाची गरज बनली आहे.
​'लोकहित मंच, सांगली'च्या माध्यमातून आम्ही काही महत्त्वाच्या मागण्या आणि सूचना मांडत आहोत:
​✅ वाहतूक आणि पायाभूत सुविधा: ई-बस सेवा सुरू करणे, शहरात मल्टिलेव्हल पार्किंगची सोय करणे आणि महत्त्वाच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे.
✅ पर्यटन विकास: सांगलीतील गणपती मंदिर, हरिपूर, औदुंबर, नृसिंहवाडी या धार्मिक स्थळांना जोडणारी 'टुरिस्ट बस सेवा' सुरू करावी.
✅ स्वच्छता आणि आरोग्य: महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी दर्जेदार स्वच्छतागृहे, शहरात वॉटर एटीएम आणि कचरा उठावासाठी 'घंटागाड्यांचे' प्रभावी नियोजन.
✅ महिला सक्षमीकरण: बचत गटांतील महिलांना ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी शासकीय योजनांतून अर्थसाहाय्य मिळवून देणे.
✅ प्रलंबित प्रश्न: कवलापूर विमानतळाला गती देणे, बंद पडलेली बाल रेल्वे सुरू करणे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे.
​सांगलीला एक 'स्मार्ट' आणि 'सुंदर' शहर बनवण्यासाठी फक्त घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. नवीन महापौरांनी या सर्व प्रश्नांची तड लावून जनतेला दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे.


​आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या