|| विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल ||
🚩 *विठ्ठल भक्तांसाठी मोठी बातमी....*
*फक्त रू 525 खर्चून सांगली ते पंढरपूर मासिक रेल्वे पास खरेदी करा...*
*सांगली रेल्वे स्टेशनवरून महिनाभर सांगली ते पंढरपूर व परत पंढरपूर ते सांगली प्रवास कितीही वेळा करा...*
🙏*रोज विठ्ठल दर्शन करा.....*
*सांगली ते पंढरपूर मासिक रेल्वे पास विक्री सांगली रेल्वे स्टेशनवर सुरू झाली*
*सांगली स्टेशन ते जत रोड, कवठेमहांकाळ, ढालगाव, सलगरे. आरगचे मासिक रेल्वे पास विक्री देखील सांगली स्टेशनवर सुरू आहे*
सांगली जिल्ह्यातील लाखो विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यास आम्हाला मनःपूर्वक आनंद होत आहे.
रेल्वे बोर्डाच्या नियमाप्रमाणे 150 किलोमीटर अंतरावरील सर्व रेल्वे स्टेशनचे मासिक व त्री मासिक पास उपलब्ध करून देणे बंधनकारण असून सांगली रेल्वे स्टेशन वरून पंढरपूर रेल्वे स्टेशन हे फक्त 144 किलोमीटर दूर असल्यामुळे दैनंदिन सांगली जिल्ह्यातून पंढरपूर जाणाऱ्या प्रवाशांसाठी देखील मासिक व त्री मासिक पास उपलब्ध करून द्यावे ही मागणी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने सांगली रेल्वे स्टेशनच्या प्रशासनाला केली होती.
ही मागणी मान्य करत सांगली रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशन वरील तिकीट बुकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगली रेल्वे स्टेशन ते पंढरपूर मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनचे मासिक व त्री मासिक पासची विक्री सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सांगली ते पंढरपूर मासिक किंवा त्रीमासिक पास काढून प्रवासी रोज कितीही वेळा सांगली रेल्वे स्टेशन वरून पंढरपूर जाऊ शकतो व पंढरपूर ते सांगली परत येऊ शकतो. त्याचप्रमाणे सांगली ते पंढरपूर दरम्यान कोणत्याही रेल्वे स्टेशनवर कोणतीही गाडी बदलून कोणत्याही स्टेशनवर चढू-उतरू शकतो. सांगली स्टेशन वरून सांगली ते पंढरपूरचे मासिक व त्री मासिक पास मिळेल.
मासिक व त्री मासिक पास वापरून सांगली रेल्वे स्टेशन पासून आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव जत रोड, सांगोला व पंढरपूर येथे जाता येईल.
*सांगली ते पंढरपूर मासिक रेल्वे पास घेण्याचा फायदा खालील प्रमाणे आहे:*
1) सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या सांगली-परळीवैजनाथ एक्सप्रेस तसेच सातारा-दादर एक्सप्रेस या गाड्यांमधून सांगली ते पंढरपूर दरम्यान चढ-उत्तर करता येते व परत सांगली रेल्वे स्टेशन पर्यंत येऊ शकता
2) सांगली रेल्वे स्टेशन वरून कुठली गाडी पकडून मिरज जंक्शनवर उतरा आणि मिरज जंक्शन वरून पंढरपूर जाणारी गाडी सुद्धा पकडता येते.
3) पंढरपूर वरून मिरज येणारी कुठलीही रेल्वेगाडी पकडून मिरजेत उतरा वं मिरजेतून सांगली स्टेशन येणारी कुठली गाडी पकडून सांगली रेल्वे स्टेशनवर उतरू शकता
4) सांगली ते पंढरपूर मासिक पास वापरून आपण सांगली रेल्वे स्टेशन ते विश्रामबाग सांगली रेल्वे स्टेशन ते मिरज तसेच मिरज रेल्वे स्टेशन ते विश्रामबाग व मिरज रेल्वे स्टेशन ते सांगली रेल्वे स्टेशन पर्यंत महिन्याभरात कितीही वेळा प्रवास करू शकता.
*मासिक व त्री मासिक रेल्वे पासची अंदाजित किंमत*
सांगली स्टेशन ते पंढरपूर/सांगोली मासिक पास ची किंमत रू 525
सांगली स्टेशन ते पंढरपूर/सांगोला त्रिमसिक पास ची किंमत रू 1420
सांगली स्टेशन ते जत रोड/ढालगाव मासिक पास ची किंमत रू 355
सांगली स्टेशन ते जत रोड/ढालगाव त्रिमसिक पास ची किंमत रू 960
सांगली स्टेशन ते कवठेमहांकाळ मासिक पास ची किंमत रू 270
सांगली स्टेशन ते कवठेमहांकाळ त्रिमसिक पास ची किंमत रू 730
सांगली स्टेशन ते आरग/सलगरे मासिक पास ची किंमत रू 185
सांगली स्टेशन ते आरग/सलगरे त्रिमसिक पास ची किंमत रू 500
*नागरिक जागृती मंच, सांगली