*श्री एकनाथराव सहादू शेटे महाविद्यालयात बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्स कोर्स चे उदघाटन*
श्री एकनाथराव सहादू शेटे महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक येथे बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्स कोर्स चे लॉन्चिंग करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे समन्वयक श्री जितेंद्र भावसार यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक कौशल्याचे महत्व आणि संस्था तथा महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेत असलेल्या अनेक प्रकारच्या कौशल्यांची माहिती त्यांनी दिली.
बजाज फायनान्स आणि इन्शुरन्सचे समन्वयक श्री अश्विन निगुडकर आणि विकास करंजीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बँकिंग आणि विमा क्षेत्रात नोकरी,बँकिंग कायदा, नाणेबाजार व विमा प्रणाली विषयांवर चर्चा करून विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर कार्यक्रम समन्वयक वैष्णवी बडगुजर यांनी या कोर्स साठी मोलाचे सहकार्य केले. कोर्सच्या प्रशिक्षक सोनाली तेलंग यांनी विद्यार्थ्यांना कोर्स चे महत्व समजावून सांगितले त्याच बरोबर बँकिंग क्षेत्रातील संधीबद्दल माहीती दिली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी ठाकरे यांनी केले तसेच आभार प्रा.मेघा काळे यांनी मानले. अशारीतीने हा कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांसह उत्साहात पार पडला