शेटे महाविद्यालयात माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी..
शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रा. रोहिणी जगताप यांनी माता रमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी म्हणून संसार करताना काटकसर, सहनशीलता, सोशिकता, संयम या विविध गुणांचे दर्शन व त्यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सौ सोनाली तेलंग यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या सामाजिक व प्रेरणादायी कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. भारतातील सर्व कर्तृत्ववान महिला चे कार्याचा परिचय करून त्यांची प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले,तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीही माता रमाई यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. भारतीय परंपरेतील विविध पराक्रमी स्त्रीशक्तीचे महत्व विषद केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. तुषार तेलोरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.