भगुर प्राथमिक विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थ्यांसाठी क्षेत्र भेट उपक्रमातंर्गत प्रात्यक्षिक
भगुर प्राथमिक विद्यामंदिर राम मंदिर रोड शाळेत
इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत गणित विषयातील मापन या घटकातील किलोग्रॅम मीटर-लिटर या संकल्पना समजावून देताना शाळेतील शिक्षिका विजया चतुर यांनी विद्यार्थ्यांना बाजाराला प्रत्येक्ष भेट देऊन बाजारातील खाऊची,मसाल्याची,कांदा, फळभाज्या व फळांच्या दुकानासह वाळलेले बोंबील खारवलेले मासे झिंग्या यांची दुकाने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बघितले व भाव विचारून विक्रेत्यांशी संवाद साधला डझन किलो पावशेर लिटर,अशी विविध माहिती विद्यार्थ्यांनी बाजारातील भाव अनुभवून खरेदी केले.तर या उपक्रमाचे पंचक्रोशीत नागरिक कौतुक करत आहे.
तर मुलांना बाजारातील भाजी विक्रेते यांनी एक किलो १००० ग्रॅम,अर्धा किलो ५०० ग्रॅम भाजीपाला फळे तराजू, इलेक्ट्रॉनिक तराजू यांच्या साह्याने कसे मोजावे ?याचे प्रात्यक्षिक करून दाखवले डझन अर्धा डझन हा हिशोब बांगड्यांच्या द्वारे मणियार भाभीनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.शिवाय आठवडे बाजारामध्ये कोणकोणती दुकानं असतात याचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी करुन नोंदी केल्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट,मुलाखत घेणे,संवाद साधने,भाजीपाल्याचा गणिती क्रियांचा सहाय्याने (व्यवहार ज्ञान) भाव काढणे,प्रात्यक्षिक प्रत्यक्ष कृती इत्यादी शैक्षणिक क्षमता शैक्षणिक क्षमता विद्यार्थ्यांच्या जोपासल्या गेल्या क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका वंदना आडके, शिक्षिका विजया चतुर,शालेय पोषण आहार स्वयंपाकी संगीता कोळेकर,यास्मिन शेख यांनी परिश्रम घेतले बाजार भेटीनंतर प्रत्यक्ष उसाच्या ऊस रसवंतीगृह ला भेट देऊन विद्यार्थ्यांनी रस पिण्याचा आनंद घेतला.